सह्याद्रीच्या कुशीत वसलेला ऐतिहासिक गिरीदुर्ग म्हणजेच 'किल्ले विसापूर'
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यामध्ये लोहगडाजवळ विसापूर किल्ला हा एक महत्त्वाचा गिरीदुर्ग आहे. हा किल्ला मराठा आणि पेशवे यांच्या राजवटीतील ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असून, त्याने बोर घाटाच्या संरक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

साक्षी कुलकर्णी .
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये अनेक परिचित अल्पपरिचित असे गडकोट आहेत. या गडकोटांच्या सहाय्यानेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये गडकोटांना खूप मोलाचे महत्व दिले जाते. विसापूर किल्ला हा त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचा गिरीदुर्ग होय.
विसापूर हा पुणे जिल्ह्यामध्ये स्थित असलेला किल्ला आहे. पुणे जिल्ह्यातील मळवली गावापासून हा किल्ला ६ कि.मी अंतरावर स्थित आहे. या किल्ल्यास संबळगड, इसागड अशा अन्य नावाने देखील ओळखले जाते. विसापूर किल्ल्यास मावळ प्रांतातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणून पाहिले जात होते. या किल्ल्यावर सध्या पाण्याचे तळे, काही देवी-देवतांची मंदिरे, मस्जिद, गुहा, तटबंदी, बुरुज, जुन्या पद्धतीतील जाते, प्रवेशद्वार, भग्नावस्थेतील वाडा, इत्यादी निदर्शनास येते.
विसापूर किल्ल्याचा इतिहास पहावयास गेले तर हा किल्ला १७१३ ते १७२० या कालखंडामध्ये पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी बांधलेला आहे. पुढे त्यानंतर पहिले बाजीराव यांनी विसापूर किल्ल्यामध्ये काही बदल घडवून किल्ल्याचा जिर्णोद्धार केला होता. १६४८ च्या दरम्यान हा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वराज्यात समाविष्ट केला होता पण पुरंदर तहमध्ये तो मोगलांकडे सुपूर्त करावा लागला होता. छ. शिवाजी महाराजांनी काही कालावधीतच मोघलांकडून विसापूर किल्ला जिंकून स्वराज्यामध्ये समाविष्ट केला आणि अशाप्रकारे तेव्हापासून हा किल्ला स्वराज्याच्या कामकाजामध्ये एक मोलाची भूमिका बजावणारा किल्ला ठरला होता.
पेशवाई राजवटीमध्ये बाजीराव पेशवे यांनी दिल्ली मधून आणलेली तोफ या गिरीदुर्गावर ठेवली होती असे काही इतिहास अभ्यासकांचे मत आहे. १८१८ मध्ये जनरल प्राॅथर यांनी विसापूर गडावर ताबा मिळवला होता. काही ऐतिहासिक नोंदीमध्ये लोहगड आणि विसापूर किल्ल्यास “इसागड”, “संबळगड” किल्ला म्हणून नोंदवल्याचा उल्लेख दिसून येतो.
विसापूर किल्ला हा बोर घाटाचे म्हणजेच लोणावळा-खंडाळा घाटाचे संरक्षण करणारा होता तसेच लोहगडाचे देखील संरक्षण करणारा होता. काही राजवटींच्या कालखंडामध्ये विसापूर किल्ल्यावर कैद्यांना अथवा गुन्हेगारांना ठेवले जात होते. विसापूर किल्ला हा ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरलेला किल्ला आहे. या गडाचा इतिहासच लक्षवेधी असल्यामुळे या किल्ल्याबाबत मनामध्ये आपसूकच आदर निर्माण होतो.
- जाऊ किल्ल्यांच्या प्रांतामहाराष्ट्रछत्रपती शिवाजी महाराजसंबळगडइसागडपेशवे कालखंडलोणावळा-खंडाळा घाटपेशवाई राजवटजनरल प्राॅथरPeshwa periodLonavala-Khandala GhatPeshwa ruleGeneral Pratherविसापूर किल्ला पुणेअल्पपरिचित किल्लेपुणे जिल्ह्यातील किल्लेमावळ तालुक्यातील किल्लेपेशवे काळगडकोट महाराष्ट्रमहाराष्ट्रातील किल्लेविसापूर FortVisapur Fort PuneLesser known forts in MaharashtraHistorical forts near Pune

Ashiti Joil
यह प्रातःकाल में कंटेंट रायटर अँड एडिटर के पद पर कार्यरत हैं। यह गए 3 सालों से पत्रकारिता और डिजिटल मीडिया में सक्रिय हैं। इन्होंने लोकसत्ता, टाईम महाराष्ट्र, PR और हैट मीडिया में सोशल मीडिया कंटेंट रायटर के तौर पर काम किया है। इन्होंने मराठी साहित्य में मास्टर डिग्री पूर्ण कि है और अभी ये यूनिवर्सिटी के गरवारे इंस्टीट्यूड में PGDMM (Marthi Journalism) कर रही है। यह अब राजकरण, बिजनेस , टेक्नोलॉजी , मनोरंजन और क्रीड़ा इनके समाचार बनती हैं।
