महाराष्ट्राला लाभलेल्या गडकोटांच्या अद्भुत वारशापैकी, पुणे जिल्ह्यातील तैलबैला किल्ला हा त्याच्या जुळ्या सुळक्यांमुळे आणि ज्वालामुखीच्या लाव्हापासून झालेल्या अनोख्या निर्मितीमुळे खास ओळखला जातो. मराठी साम्राज्याच्या काळात कोकण बंदर आणि अंतर्देशीय बाजारपेठेच्या दळणवळणाचे संरक्षण करणारा हा किल्ला एक महत्त्वाचा दुवा ठरला होता.

साक्षी कुलकर्णी.


महाराष्ट्राला गडकोटांचा एक अद्भुत वारसा लाभला आहे. इथे असणारे प्रत्येक किल्ले हे वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी बनले आहेत. तैलबैला किल्ला हा देखील अनोख्या पद्धतीने घडलेला व निर्माण झालेला किल्ला आहे. इतर किल्ल्यांच्या तुलनेत या किल्ल्याची निर्मिती वेगळ्या पद्धतीची असल्याचे दिसून येते.

तैलबैला किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळा गावापासून अवघ्या ३४ कि.मी. अंतरावर स्थित आहे. हा किल्ला लोणावळा डोंगररांगेच्या कुशीमध्ये विसावला आहे. या किल्ल्याचे पूर्वीचे नाव बैलतळ असे होते तसेच कावडीचा डोंगर या नावाने देखील तेलबैला किल्ल्यास संबोधले जात होते. जुळ्या सुळक्याचा किल्ला अशी अनोखी आणि आगळीवेगळी ओळख तैलबैला किल्ल्याची आहे. सध्या किल्ल्यावर तेलबैलाची माची, V आकाराची खिंड, कातळातील भिंत, पाण्याचे टाके, काही देवी-देवतांच्या मूर्ती, इत्यादी निदर्शनास येते.



भौगोलिक दृष्टिकोनातून पाहिले तर तैलबैला किल्ल्याची निर्मिती वेगळ्या पद्धतीने झालेली दिसून येते. ज्वालामुखीच्या उद्रेकांमधून व उद्रेकानंतर पसरलेल्या लाव्हापासून किल्ल्यांच्या भिंती विशिष्ट प्रकारच्या रचनेमध्ये घडल्या गेल्या आहेत ते दिसून येते. किल्ल्यांच्या भिंतीस दुहेरी दगडी भिंत म्हणून ओळखले जात होते आणि अजूनही ओळखले जात आहे.

तैलबैलाच्या किल्ल्याच्या इतिहासाकडे डोकावून पाहता हा किल्ला मराठी साम्राज्याच्या राजवटीमध्ये असताना निर्माण झालेला आहे. भारतावर ब्रिटिशांची जुलमी राजवट चालू असताना देखील हा किल्ला सुरक्षितरित्या पेशव्यांच्या अधिपत्याखाली होता पण इंग्रजांनी किल्ल्याच्या काही पायऱ्या खाणी व गनपावडरचा वापर करून मोडून काढल्या आणि नष्ट करून टाकल्या आहेत असे काही इतिहास अभ्यासकांचे मत आहे.



तैलबैला किल्ला इतिहासामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावणारा किल्ला ठरला होता. इतिहासामध्ये हा किल्ला महत्त्वाचा ठरला होता कारण की, कोकण बंदर ते अंतर्देशीय बाजारपेठ या किल्ल्याच्या नजीक होती. या किल्ल्याद्वारेच कोकण बंदर ते अंतर्देशीय बाजारपेठ या मार्गावर होणाऱ्या दळणवळणाचे संरक्षण केले जात होते. या किल्ल्यावरूनच कोकण बंदर आणि अंतर्देशीय बाजारपेठ यांच्यावर पहारा दिला जाई आणि संरक्षण पुरवले जात होते.

भौगोलिक दृष्ट्या अनोखा असणारा हा किल्ला एक वेगळ्या पद्धतीचे किल्ल्याचे बांधकाम दाखवून देतो तसेच किल्ल्याच्या परिसरातील निसर्ग सौंदर्याचे दर्शन देखील घडवतो. इतिहासामध्ये महत्त्वाचा ठरलेला हा किल्ला नैसर्गिकदृष्ट्या देखील एक मोलाचा वारसा आहे.

Updated On 9 Oct 2025 6:59 PM IST
Ashiti Joil

Ashiti Joil

यह प्रातःकाल में कंटेंट रायटर अँड एडिटर के पद पर कार्यरत हैं। यह गए 3 सालों से पत्रकारिता और डिजिटल मीडिया में सक्रिय हैं। इन्होंने लोकसत्ता, टाईम महाराष्ट्र, PR और हैट मीडिया में सोशल मीडिया कंटेंट रायटर के तौर पर काम किया है। इन्होंने मराठी साहित्य में मास्टर डिग्री पूर्ण कि है और अभी ये यूनिवर्सिटी के गरवारे इंस्टीट्यूड में PGDMM (Marthi Journalism) कर रही है। यह अब राजकरण, बिजनेस , टेक्नोलॉजी , मनोरंजन और क्रीड़ा इनके समाचार बनती हैं।

Next Story