भीमा खोऱ्यात वसलेला आणि राजगुरुनगरच्या इतिहासाशी जोडलेला भोरगिरी किल्ला हा यादवकालीन स्थापत्य, प्राचीन गुहा, व्यापारी मार्गांवरील पहारा आणि सह्याद्रीचे विलोभनीय वैभव यांची सांगड घालणारा अल्पपरिचित पण ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा गिरीदुर्ग आहे.

- साक्षी कुलकर्णी.

Bhoragiri Fort :
भारतमातेसाठी आपला जीवपणाला लावून लढणारे क्रांतिकारक राजगुरू यांचा जन्म झालेली पावन भूमी म्हणजे खेड होय. राजगुरू यांच्या आदरा प्रित्यर्थ खेड गावचे नामांतर करून राजगुरुनगर असे करण्यात आले आहे. या राजगुरुनगर मध्ये भोरगिरी किल्ला स्थित आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर पासून हा किल्ला ५३ कि.मी. अंतरावर स्थित आहे. हा गिरीदुर्ग भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये विसावलेला आहे तसेच किल्ल्याचा परिसर निसर्ग संपन्न आहे. अवती-भोवतीचे वातावरण शांततामय आहे. या किल्ल्यास भोरगिरी बरोबरच भंवरगिरी नावाने देखील ओळखले जाते.


या किल्ल्यावरून कोकण ते पुणे होणाऱ्या व्यापारी मार्गावर पहारा ठेवला जात होता तसेच किल्ल्याच्या नजीकहून भोरगिरी ते भीमाशंकर आणि भीमाशंकर ते खांडस हा व्यापारी दळणवळणाचा मार्ग जात होता. या सर्व व्यापारी व दळणवळणाच्या मार्गावर भोरगिरी किल्ल्यावरून करडी नजर ठेवली जात असे. या व्यापारी मार्गावर होणाऱ्या सर्व हालचालींवर पहारा ठेवण्याचे काम भोरगिरी किल्ल्यावरून होत होते.


काही इतिहासकारकांच्या मते हा किल्ला लष्करीदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला होता. यादव कालखंडमध्ये भोरगिरी किल्ला बांधला गेला असल्याचे काही इतिहास नोंदी असल्याचे दिसून येते पण किल्ल्यावर होऊन गेलेल्या राजवटी व त्या राजवटींचा कालावधी यासारख्या अनेक बाबींचा अजूनही उलगडा झाला नाही.


भोरगिरी किल्ल्यावर ९ व्या शतकातील प्राचीन गुहा आजही पहावयास मिळते तसेच गुहेतील शिवलिंग, पाण्याची टाकी, तटबंदी, व्याघ्र शिल्प, पाण्याचे नैसर्गिक कुंड, वीरगळ, कातळात खोदलेल्या पायऱ्या इत्यादी बाबी सुद्धा पहावयास मिळतात. भोरगिरी किल्ला परिचित असला तरीदेखील ऐतिहासिक माहितीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर हा किल्ला अल्पपरिचित आहे. या किल्ल्यावरून महाराष्ट्र भूमीतील सह्याद्रीच्या विलोभनीय वैभवाचे दर्शन घडते.




Updated On 17 Nov 2025 6:54 PM IST
Ashiti Joil

Ashiti Joil

यह प्रातःकाल में कंटेंट रायटर अँड एडिटर के पद पर कार्यरत हैं। यह गए 3 सालों से पत्रकारिता और डिजिटल मीडिया में सक्रिय हैं। इन्होंने लोकसत्ता, टाईम महाराष्ट्र, PR और हैट मीडिया में सोशल मीडिया कंटेंट रायटर के तौर पर काम किया है। इन्होंने मराठी साहित्य में मास्टर डिग्री पूर्ण कि है और अभी ये यूनिवर्सिटी के गरवारे इंस्टीट्यूड में PGDMM (Marthi Journalism) कर रही है। यह अब राजकरण, बिजनेस , टेक्नोलॉजी , मनोरंजन और क्रीड़ा इनके समाचार बनती हैं।

Next Story