संतोषगड : सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला इतिहासाचा जिवंत पहारेकरी
सह्याद्रीच्या मसोबा डोंगररांगेत विसावलेला संतोषगड हा साताऱ्याच्या इतिहासातील महत्त्वाचा किल्ला म्हणून ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील या गडाने टेहळणी, संरक्षण आणि पुरवठा व्यवस्थेत निर्णायक भूमिका बजावली. आजही त्याचे अवशेष स्वराज्याच्या शौर्यकथांचा अभिमान जपतात.

साक्षी कुलकर्णी .
इतिहासामध्ये महाराष्ट्राची राजधानी म्हणून सातारा जिल्ह्यास ओळखले जाते. इतिहासातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा सातारा जिल्हा साक्षीदार आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये संतोषगड स्थित आहे. हा संतोषगड साताऱ्यापासून अवघ्या ५३ कि.मी. अंतरावर आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगेमधील मसोबा डोंगर रांगांच्या कुशीमध्ये संतोषगड विसावलेला आहे. या किल्ल्यास “ताथवडेचा किल्ला” म्हणून देखील ओळखले जाते. किल्ल्यावर सध्या दरवाजा, पाण्याचे टाके, वाड्याचे अवशेष, तटबंदी, बुरुज, धान्य कोठाराचे अवशेष, इत्यादी महत्त्वाच्या वास्तू इतिहास सांगत उभे असल्याचे दिसून येते.
संतोषगडाजवळील स्थानिक गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आणि माहितीनुसार हा किल्ला छ. शिवाजी महाराजांनी बांधला होता. १६६६ मध्ये हा किल्ला बजाजी नाईक निंबाळकर यांच्याकडे होता. नंतर संतोषगडवर मोघलाई, मराठी राजवट आणि आदिलशाही यांच्या राजवटी होऊन गेल्या. १६७३ मध्ये हा किल्ला पुन्हा स्वराज्याचा भाग बनला.
संतोषगडाची उंची सुमारे २९०० फूट उंच आहे. हा गड उंचावर आहे त्यामुळे टेहळणी करणे करिता संतोष गड उत्तम ठरत होता. मोळ घाटावर पहारा ठेवत होता तसेच येथून इतर सैन्य दलास धान्य आणि दारूगोळा यांचा पुरवठा केला जाई. सातारा जिल्ह्याच्या पावनभूमीमध्ये असलेला संतोषगड इतिहासामध्ये मोलाची भूमिका बजावणारा सहाय्यक किल्ला ठरला होता.
- Satoshgad Itihas SataraSantoshgad history Satara districtTathwadecha killa Falatan talukaSahyadri masoba dongarrange gadShivaji Maharaj banavlela SantoshgadSantoshgad 2900 foot unchiMol ghat pahara SantoshgadSantoshgad Swarajya 1673Santoshgad Bajaji Naik NimbalkarSatoshgad Maratha Adilshahi historySantoshgad fort near SataraSantoshgad archaeological remains SataraSantoshgad travel history Maharashtrahistory of Santoshgad fort MaharashtraSantoshgad killa sahityik varnanPratahkal DailyPratahkal NewsIndia

Ashiti Joil
यह प्रातःकाल में कंटेंट रायटर अँड एडिटर के पद पर कार्यरत हैं। यह गए 3 सालों से पत्रकारिता और डिजिटल मीडिया में सक्रिय हैं। इन्होंने लोकसत्ता, टाईम महाराष्ट्र, PR और हैट मीडिया में सोशल मीडिया कंटेंट रायटर के तौर पर काम किया है। इन्होंने मराठी साहित्य में मास्टर डिग्री पूर्ण कि है और अभी ये यूनिवर्सिटी के गरवारे इंस्टीट्यूड में PGDMM (Marthi Journalism) कर रही है। यह अब राजकरण, बिजनेस , टेक्नोलॉजी , मनोरंजन और क्रीड़ा इनके समाचार बनती हैं।
