पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात स्थित अनघाई किल्ला हा एक अल्पपरिचित पण ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा गड आहे. घनदाट झाडीत वसलेला हा किल्ला देवगिरी यादवांच्या काळात बांधला गेला असून अंबा नदीच्या खोऱ्यावर पहारा ठेवण्यासाठी उपयोगात आणला जात होता. अनघाई देवीचे मंदिर, पाण्याची टाके आणि कातळातील कोरीव रचना यामुळे हा किल्ला विशेष आकर्षक ठरतो.

अल्पपरिचित गडकोटांची माहिती जाणून घेण्यामध्ये एक वेगळे समाधान असते. अल्पपरिचित किल्ल्यांची माहिती जाणून घेतल्याने इतिहासाच्या ज्ञानामध्ये आणखी भर पडते तसेच माहित नसलेल्या किल्ल्यांचे महत्व देखील कळते. पुणे जिल्ह्यातील अनघाई किल्ला हा देखील एक अल्पपरिचित किल्ला आहे.


अनघाई किल्ला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये स्थित आहे. हा किल्ला पुण्यापासून अंदाजे ५० ते ६० कि.मी. अंतरावर आहे. पुण्यातील कळंब गावात नजीकहून या गिरीदुर्गाकडे मार्गस्थ होता येते. या किल्ल्या नजीक असणारे कळंब गाव हे रायगड जिल्ह्यामध्ये येत असले तरी देखील अनघाई किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये येतो.

या अल्पपरिचित किल्ला घनदाट झाडी-झुडपांमध्ये आणि आमराईमध्ये वसलेला आहे तसेच या किल्ल्यास घळीच्या मार्गाने जावे लागते म्हणून हा किल्ला विशेषतः आकर्षित वाटतो. अनघाई डोंगररांगांच्यामध्ये हा किल्ला वसलेला आहे. या किल्ल्यास अनघाई देवीचा किल्ला असे देखील म्हटले जाते.

या किल्ल्यावर सद्यस्थितीत कातळामध्ये घडविलेल्या खोबण्या, कातळ भिंत, गुहा, कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या, देवीचे मंदिर, पाण्याचे टाके, सुळका, बुरुजे, इत्यादी पहावयास मिळते. या किल्ल्याबाबतीत इतिहासामध्ये डोकावले तर ठोस आणि स्पष्ट माहिती दिसून येत नाही. स्थानिक लोकांकडून किल्ल्या संदर्भातील वेगवेगळ्या कथा ऐकावयास मिळतात.

अनघाई किल्ला हा देवगिरी यादवांच्या राजवटीमध्ये बांधला गेलेला किल्ला आहे. या किल्ल्याचा मुख्य उपयोग हा अंबा नदीच्या खोऱ्यावर पहारा देणे तसेच तेथील परिसराचे संरक्षण करणे हा होता. अंबा नदीच्या खोऱ्यामध्ये शत्रू कडून कोण कोणत्या हालचाली होतात यावर लक्ष ठेवले जात व शत्रूपासून होणाऱ्या हल्ल्याकडून सुरक्षितपणे बचाव केला जात होता.

रायगड जिल्हा व पुणे जिल्हा यांच्या सीमा भागामध्ये असणारा अनघाई किल्ला हा निसर्गातील अनोख्या वृक्षवल्लींचे दर्शन घडवतो तसेच अल्पपरिचित असणाऱ्या अनघाई किल्ल्याच्या मोलाची भूमिका असणाऱ्या इतिहासाची ओळख करून देतो.

Updated On 17 Nov 2025 4:07 PM IST
Ruturaj Ravan

Ruturaj Ravan

यह प्रातःकाल मल्टीमीडिया में वेबसाइट मैनेजर और सोशल मीडिया एक्जीक्यूटिव के रूप में कार्यरत हैं, और पिछले तीन वर्षों से पत्रकारिता व डिजिटल मीडिया में सक्रिय हैं। इससे पूर्व उन्होंने दैनिक प्रहार में वेबसाइट प्रबंधन और सोशल मीडिया के लिए रचनात्मक कंटेंट निर्माण और रणनीतियों में अनुभव अर्जित किया। इन्होंने कोल्हापुर के छत्रपति शिवाजी महाराज विश्वविद्यालय से स्नातक और हैदराबाद के सत्या इंस्टीट्यूट से उच्च शिक्षा पूरी की। इन्हें SEO मैनेजमेंट, सोशल मीडिया और उससे संबंधित रणनीतियाँ तैयार करने में व्यापक अनुभव है।

Next Story