महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांच्या परंपरेतील एक वेगळी ओळख म्हणजे इंदुरी किल्ला. पुणे जिल्ह्यापासून ३६ कि.मी. अंतरावर असलेला हा किल्ला सपाट भूभागावर असल्याने भुईकिल्ला प्रकारात मोडतो, ज्याला "सरसेनापतींची गढी" म्हणूनही ओळखले जाते.

साक्षी कुलकर्णी .


महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारांमध्ये स्थित असलेले गडकोट पाहण्यास मिळतात. प्रत्येक किल्ला हा वेगवेगळ्या शैलीमध्ये बांधला गेलेला आहे. प्रत्येक किल्ल्याचे भौगोलिक वैशिष्ट्य देखील वेगळे असल्याचे दिसून येते. इंदुरी किल्ला हा भुईकिल्ला वर्गातील किल्ला आहे.

इंदुरी किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे. हा किल्ला पुण्यापासून ३६ कि.मी. अंतरावर स्थित आहे. या किल्ल्यास “इंदुरीचा किल्ला”,” सरसेनापतींची गढी” या अन्य नावाने देखील ओळखले जाते. हा किल्ला सपाट भूभागावर असल्याकारणाने हा किल्ला भुईकिल्ला प्रकारातील किल्ल्यांमध्ये येतो.



किल्ल्यावर प्रवेशद्वार, बुरूज, तटबंदी, कडजाई देवी मंदिर, नगारखाना, पहारेकरांच्या देवड्या, हवामहाल आणि अत्यंत सुरेख पद्धतीने कोरलेली कमान, इत्यादी. इतिहासामध्ये घडलेल्या घटनांची साक्ष देत उभे असल्याचे पहावयास मिळते तसेच किल्ल्यावर प्राचीन शिल्पकला देखील पाहण्यास मिळते.

सरसेनापती खंडोजीराव येसाजी दाभाडे यांनी १७२१ च्या सुमारास इंदोरी किल्ला बांधला. खंडोजीराव दाभाडे हे मराठी साम्राज्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे सेनापती होते. सेनापती दाभाडे यांची समाधी तळेगाव दाभाडे येथे असणाऱ्या श्रीमंत सरसेनापती दाभाडे श्री बनेश्वर मंदिर येथे आहे.

हा किल्ला एक तपासणी नाक्याचे कामकाज करत होता. भुईकिल्ला वर्गातील हा किल्ला असल्याने येथून तपासणी करणे सोपे ठरत होते तसेच मराठी राजवट असताना या किल्ल्यावरून काही काळ लष्करी आणि प्रशासकीय कामे सुद्धा पार पडली जात होती. लष्करी काम, प्रशासकीय काम आणि तपासणी नाक्याचे काम येथून होत असल्यामुळे मराठी साम्राज्याच्या राजवटीमध्ये इंदुरी किल्ला मोलाचे योगदान देणारा किल्ला ठरला होता.


भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रातील इतर गडकोटांच्या तुलनेत हा किल्ला लहान आहे पण मंद वाहत जाणाऱ्या इंद्रायणी नदीचा काठ आणि आजूबाजूला लाभलेला निसर्गरम्य परिसर सर्व निसर्गप्रेमींना, किल्ले प्रेमींना आणि सर्वांनाच आकर्षित करणारा ठरतो.

Updated On 17 Nov 2025 4:02 PM IST
Ashiti Joil

Ashiti Joil

यह प्रातःकाल में कंटेंट रायटर अँड एडिटर के पद पर कार्यरत हैं। यह गए 3 सालों से पत्रकारिता और डिजिटल मीडिया में सक्रिय हैं। इन्होंने लोकसत्ता, टाईम महाराष्ट्र, PR और हैट मीडिया में सोशल मीडिया कंटेंट रायटर के तौर पर काम किया है। इन्होंने मराठी साहित्य में मास्टर डिग्री पूर्ण कि है और अभी ये यूनिवर्सिटी के गरवारे इंस्टीट्यूड में PGDMM (Marthi Journalism) कर रही है। यह अब राजकरण, बिजनेस , टेक्नोलॉजी , मनोरंजन और क्रीड़ा इनके समाचार बनती हैं।

Next Story