महाराष्ट्र के चाकण स्थित संग्रामगढ़ किला अपनी भुईकोट रचना, मराठा–मुगल संघर्ष और फिरंगोजी नरसाळा के वीरत्व के लिए प्रसिद्ध है। शिवाजी महाराज द्वारा स्वराज्य में समाविष्ट किए गए इस किले का इतिहास व्यापार, सामरिक महत्त्व और शौर्यगाथाओं से भरा है। आज भी इसके अवशेष उस गौरवशाली अतीत की साक्ष देते हैं।

साक्षी कुलकर्णी.

महाराष्ट्राच्या समृद्ध दुर्गसंस्कृतीत भुईकोट किल्ल्यांना एक वेगळे स्थान लाभले आहे. सपाट भूभागावर बांधलेले हे किल्ले सामरिकदृष्ट्या जितके महत्त्वाचे, तितकेच त्यांच्या वास्तुशिल्पात दडलेले वैभव आजही पर्यटकांना आकर्षित करते. पुण्यापासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर असलेला चाकण किल्ला, ज्यास संग्रामगड म्हणूनही ओळखले जाते, याच परंपरेचा दिमाखदार साक्षीदार आहे.


चाकण हे पूर्वी दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र होते. व्यापारी मार्गांचे संरक्षण आणि येथील वसाहतींची सुरक्षितता हे कार्य या किल्ल्यावरूनच पार पाडले जात होते. गावाचा मुख्य संरक्षक म्हणून ओळख मिळाल्यानेच या दुर्गास चाकण किल्ला हे नाव प्राप्त झाले. ऐतिहासिक नोंदी दर्शवितात की हा किल्ला १२व्या–१३व्या शतकादरम्यान एका मुस्लिम राजाने उभारला होता. पुढील काळात १५९० ते १५९५ दरम्यान तो निजामशाहीच्या ताब्यात राहिला. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांना मिळालेली चाकणची जहागिरीही या किल्ल्याच्या इतिहासातील महत्त्वाची घटना ठरली. १६३० च्या सुमारास आदिलशाहीने येथे वर्चस्व प्रस्थापित केले.


१९ नोव्हेंबर १६४७ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला स्वराज्यात सामील करून त्याचे नामांतर ‘संग्रामगड’ असे केले. परंतु १६६० मध्ये शाहिस्तेखानाच्या फौजांनी येथील ताबा मिळवला. किल्ला टिकवण्यासाठी फिरंगोजी नरसाळे यांनी शाहिस्तेखानाविरुद्ध शौर्यपूर्ण लढा दिला, परंतु ती मोहीम अपुरी ठरली. काही काळानंतर मराठी मावळ्यांनी पुन्हा एकदा चाकण किल्ला स्वराज्यात सामावून घेतला आणि त्याच्या इतिहासात नवे पान जोडले.


आजही किल्ल्यातील भक्कम तटबंदी, उंच बुरुज, खोल खंदक, तोफा, गुप्त भुयारे, शिल्पवैभव, वीरगळ, विष्णू मंदिर, चक्रेश्वराची मूर्ती, पाण्याची टाकी, तसेच इतर पुरातन वास्तूंचे अवशेष, या दुर्गाच्या सामरिक महत्त्वाची साक्ष देत उभे आहेत. शतकानुशतके संघर्ष आणि बदलत्या सत्तांचा इतिहास अनुभवलेला हा भुईकोट आजही महाराष्ट्राच्या गड-कोट परंपरेचे सामर्थ्य आणि स्वराज्याच्या इतिहासाचे तेजस्वी प्रतीक म्हणून उभा आहे.

Updated On 1 Dec 2025 7:01 PM IST
Ashiti Joil

Ashiti Joil

यह प्रातःकाल में कंटेंट रायटर अँड एडिटर के पद पर कार्यरत हैं। यह गए 3 सालों से पत्रकारिता और डिजिटल मीडिया में सक्रिय हैं। इन्होंने लोकसत्ता, टाईम महाराष्ट्र, PR और हैट मीडिया में सोशल मीडिया कंटेंट रायटर के तौर पर काम किया है। इन्होंने मराठी साहित्य में मास्टर डिग्री पूर्ण कि है और अभी ये यूनिवर्सिटी के गरवारे इंस्टीट्यूड में PGDMM (Marthi Journalism) कर रही है। यह अब राजकरण, बिजनेस , टेक्नोलॉजी , मनोरंजन और क्रीड़ा इनके समाचार बनती हैं।

Next Story