साताऱ्याच्या फलटणजवळील वारुगड हा ऐतिहासिक गडकोट सह्याद्रीच्या कुशीत लपलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६ साली बांधलेला हा किल्ला व्यापारी मार्गावर पहारा ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण होता. भैरवनाथ मंदिर, बुरुज, तलाव, शिल्पे व इतर अवशेषांसह वारुगड महाराष्ट्राच्या इतिहासाचा अप्रतिम ठेवा आहे.

- साक्षी कुलकर्णी

Warugad gad :
सह्याद्रीच्या विशाल डोंगररांगेमध्ये महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा विसावलेला आहे. हा ठेवा म्हणजे महाराष्ट्राच्या पावन भूमीची ओळख होय. सह्याद्रीच्या कुशीतील डोंगर रांगेमध्ये विलोभनीय असा महाराष्ट्राचा ठेवा आहे हा ठेवा म्हणजेच गडकोट होय.

Warugad gad

महाराष्ट्राच्या महादेव डोंगररांगेच्या कुशीमध्ये वारुगड स्थित आहे.वारुगड सातारा जिल्ह्यातील फलटण पासून २७ कि.मी.अंतरावर आहे. सध्या या किल्ल्यावर आपण भैरवनाथ मंदिर, गोमुखी प्रवेशद्वार, पाण्याचे टाके, बुरुज, तटबंदी, तलाव, छोटा बालेकिल्ला, अनेक शिल्पे, जुन्या मंदिराचे अवशेष व दगडी जाते पाहू शकतो.


Warugad gad tourism

वारुगडाच्या इतिहासामध्ये डोकावले असता फारशी माहिती दिसून येत नाही. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६ च्या दरम्यान बांधला होता. वारुगडावरून साताऱ्याच्या डोंगररांगेवर आणि परिसरावर लक्ष ठेवले जात होते तसेच येथून कोकण ते कोल्हापूर होणाऱ्या व्यापारी दळणवळणाच्या मार्गावर पहारा दिला जात होता.

Warugad gad

१८१८ मध्ये हा किल्ला साताऱ्याच्या राजाचे फडणवीस विठ्ठलपंत यांच्याकडे होता. पेशवाईनंतर इंग्रजांनी वारुगडावर वर्चस्व मिळवले होते. इंग्रजांनी गडावर आपले वर्चस्व मिळवल्यानंतर गडाची नासधुस देखील केली होती.

ऐतिहासिक माहितीचा फारसा उलगडा न झालेला वारुगड कोकण ते कोल्हापूर व्यापारी मार्गासाठी फार उपयुक्त ठरला होता हे निश्चित. सातारा जिल्ह्यातील अन्य पर्यटन स्थळाबरोबरच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मोलाचे योगदान देणारा आणि अल्पपरिचित असणाऱ्या वारुगडास आवश्यक भेट दिली पाहिजे.

Updated On 8 Dec 2025 4:46 PM IST
Ashiti Joil

Ashiti Joil

यह प्रातःकाल में कंटेंट रायटर अँड एडिटर के पद पर कार्यरत हैं। यह गए 3 सालों से पत्रकारिता और डिजिटल मीडिया में सक्रिय हैं। इन्होंने लोकसत्ता, टाईम महाराष्ट्र, PR और हैट मीडिया में सोशल मीडिया कंटेंट रायटर के तौर पर काम किया है। इन्होंने मराठी साहित्य में मास्टर डिग्री पूर्ण कि है और अभी ये यूनिवर्सिटी के गरवारे इंस्टीट्यूड में PGDMM (Marthi Journalism) कर रही है। यह अब राजकरण, बिजनेस , टेक्नोलॉजी , मनोरंजन और क्रीड़ा इनके समाचार बनती हैं।

Next Story