AI : युद्धभूमीवरील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI); भारताच्या संरक्षण सामर्थ्याचा 'डिजिटल' बूस्टर
AI : भारताच्या संरक्षण धोरणात आधुनिकतेची क्रांती होत आहे! केंद्र सरकार संरक्षण दलांना अधिक कार्यक्षम आणि सक्षम बनवण्यासाठी AI च्या वापरावर भर देत आहे, ज्यामुळे मानवरहित वाहनांपासून डेटा विश्लेषणापर्यंत अनेक नवीन तंत्रज्ञान युद्धभूमीवर पाहायला मिळतील.

- अशिती जोईल.
सुरज : अहो आजोबा तुम्हाला ऑपरेशन सिंदूर आठवतंय का ? ज्यात आपण पाकिस्तान वर विजय मिळवला होता ? ते कास पार पडलं होत माहित आहे का ?
आजोबा : हो आठवतंय ना .. पण कस पार पडलं होत ते , आपल्या सैनीकांनीच तर त्याची दाणादाण उडवली होती ना ?
सुरज : अहो हो आजोबा पण यात सर्वात मोठा वाटा कोणाचा होता माहित आहे का , तर तो मोठा वाटा होता AI आर्टिफिशल इंटेलिजन्स चा .
आजोबा : अरे बापरे खर ! म्हणजे आपलं आताच तंत्रज्ञान एवढ्यापुढे गेलय ?
सुरज : अहो हो आजोबा हे तर काहीच नाही या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या वापराने आता आपण सीमा सुरक्षितते पासून शेती पर्यंत सर्व काही काहीच क्षणात करू शकतो.
आता हा संवाद वाचल्यावर तुम्हाला सर्वांनाही प्रश्न पडलाच असेल ना, की AI चा वापर आपण चक्क सीमा सुरक्षेसाठी कसा बरं करणार? वगैरे वगैरे निरनिराळ्या शंका - कुशंका आपल्या मनात येतच असतील. पण काळजी नका करू आपण या सर्वांसंदर्भात आपल्या या आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. या पूर्वीही 'टेक्नॉलॉजिया' या सदराच्या माध्यमातून आपण AI चा वेगवेगळ्या क्षेत्रातील वापर, त्याचा उपयोग, AI म्हणजे नेमकं काय, या आणि यासारख्या काही अनेक प्रश्नांची माहिती आपण या लेखमालिकेतून घेतली. आज आपण या लेख मालिकेतील अजून एक भाग तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. चला तर मग आपण जाणून घेऊया संरक्षण, देशसीमा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांच्या मधील हा सहसंबंध.
भारताच्या संरक्षण धोरणात आधुनिकतेची क्रांती होत आहे ! केंद्र सरकार संरक्षण दलांना अधिक कार्यक्षम आणि सक्षम बनवण्यासाठी AI च्या वापरावर भर देत आहे, ज्यामुळे मानवरहित वाहनांपासून डेटा विश्लेषणापर्यंत अनेक नवीन तंत्रज्ञान युद्धभूमीवर पाहायला मिळत आहेत. यामुळे संरक्षण क्षेत्रात मोठी डिजिटल क्रांती घडणार आहे. पारंपरिक युद्धच्या पद्धती सोडून नव्या तंत्रांवर आधारित युद्धनीती व युद्धांची तयारी केली जात आहे. आजच्या जगात युद्धे ही केवळ मानवी शक्तीवर नव्हे तर यांत्रिक शक्तीवर सुद्धा जिंकली जात आहेत. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने युद्धे थोडी सोप्पी व परिणामकारक होताना दिसत आहेत. यासाठी तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रास्त्रे आणि रणनीतीक निर्णय उपायकारक ठरत आहेत. चीन, रशिया यांच्या सारख्या महासत्तांनी या क्षेत्रात प्रगती केली आहे. या नव्या शर्यतीत भारतही मागे राहू इच्छित नाही. त्यामुळे आता भारतानेही या दिशेने मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि, संरक्षण क्षेत्रात AI चा वापर कसा बर करता येईल ? चला जाणून घेऊयात .
संरक्षण क्षेत्रात AI चा वापर कसा बर करता येईल ?
खरंतरं संरक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर हा अनेक प्रकारांनी करता येऊ शकतो. यासाठी काही प्रमुख उदाहरणे आपण पुढील प्रमाणे पाहू ..
१ . मानवरहित वाहने (Unmanned Vehicles) :
यामधे मानवरहित रणगाडे, विमाने (ड्रोन) आणि नौका यांचा समावेश आहे. ही वाहने परीस्थितीला अनुसरून मानवी हस्तक्षेपा विना कार्य करू शकतात. यामुळे सैनिकांचा जीव वाचवण्यास मदत होते त्याचसोबत कमीवेळेत कार्यक्षमता वाढही करता येऊ शकते.
२ . रोबोटिक शस्त्रास्त्रे :
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित रोबोटिक शस्त्रास्त्रे ना चुकता ठरवलेल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करू शकतात. यांचा वापर हा युद्धभूमीवर शत्रूंना रोकण्याकरिता , सीमासुरक्षेकरीता आणि अधिक गुंतागुंतीच्या मोहिमांमध्ये केला जाऊ शकतो. याच सोबत सैनिकांचा प्राणही वाचला जातो.
३ . डेटा विश्लेषण :
यामध्ये युद्धभूमीवरील शत्रूचा डेटा घेण्यासाठी , शत्रूच्या गलचालींवर नजर ठेवण्यासाठी त्याचप्रमाणे भौगोलिक माहितीचे विश्लेषण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापर केला जातो. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) याच्या डीपलर्निंग आणि डेटाचे विश्लेषण यांच्या मदतीने विशीष्ट अल्गोरिदमच्या साहाय्याने शत्रूच्या प्रत्येक हालचालींवर आणि शत्रूपासून असणाऱ्या धोक्यांचा संभाव्य अंदाज लावू शकते . त्यामुळेही सीमांचे एक प्रकारचे रक्षण होण्यास मदत होते. यामुळे अचूक आणि जलद निर्णय घेणे शक्य होते.
४ . निगरणी आणि हेरगिरी :
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित कॅमेरे आणि सेन्सर्स सीमेवर सतत लक्ष ठेवू शकतात. यामुळे घुसखोरी किंवा संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित मिळू शकते. अशा विविध पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सीमा संरक्षणाचे कारण बनत आहेत . आता आपल्याला प्रश्न पडला असेल की या क्षेत्रात भविष्यातील आव्हाने आणि संधी नेमक्या काय बार असू शकतील.
भविष्यातील आव्हाने आणि संधी
संरक्षण क्षेत्रात AI चा वापर करताना काही नैतिक आणि तांत्रिक आव्हाने समोर येतात. AI-आधारित शस्त्रास्त्रांचा गैरवापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांच्या वापरासाठी कठोर नियम आणि कायदे तयार करणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी असूनही, संरक्षण क्षेत्रात AI च्या वापरामुळे भारताची सुरक्षा अधिक मजबूत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या तंत्रज्ञानामुळे भारताला जागतिक स्तरावर एक मोठी लष्करी शक्ती म्हणून ओळख मिळणे भारताच्या दृष्टीने हिताचेच असणार आहे. यामुळे भारताची संरक्षण सज्जता वाढून भविष्यातील युद्धांसाठी देश अधिक मजबुतीने तयार होऊ शकेल. या दृष्टीने केंद्रसरकार महत्वाची पाऊले उचलत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता हे केवळ एक तंत्रज्ञान नाही, तर ते भारताच्या संरक्षण क्षेत्राचे भविष्य आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. केंद्र सरकारचे हे पाऊल भारताला तांत्रिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
- कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)डेटा विश्लेषणAIArtificial intelligence (AI)Artificial intelligenceकृत्रिम बुद्धिमत्ताटेक्नोलॉजियाTechnologiaTECH NEWS HINDITECH NEWS MARATHIMumbaiMarathi NewsAI NewsAI News MarathiEnvironment and AI TechnologyMaharashtraPratahkal Newsप्रातःकाल न्यूजINDIAArtificial Intelligence (AI)

Ashiti Joil
यह प्रातःकाल में कंटेंट रायटर अँड एडिटर के पद पर कार्यरत हैं। यह गए 3 सालों से पत्रकारिता और डिजिटल मीडिया में सक्रिय हैं। इन्होंने लोकसत्ता, टाईम महाराष्ट्र, PR और हैट मीडिया में सोशल मीडिया कंटेंट रायटर के तौर पर काम किया है। इन्होंने मराठी साहित्य में मास्टर डिग्री पूर्ण कि है और अभी ये यूनिवर्सिटी के गरवारे इंस्टीट्यूड में PGDMM (Marthi Journalism) कर रही है। यह अब राजकरण, बिजनेस , टेक्नोलॉजी , मनोरंजन और क्रीड़ा इनके समाचार बनती हैं।
