सोलापूर रेल मंडल की 10 विशेष ट्रेनों की अवधि बढ़ी, यात्रियों को बड़ी राहत
होली और उन्हाळी छुट्टियों में भीड़ कम करने के लिए मध्य रेलवे ने मुंबई, अनकापल्ले और कलबुरगि रूट पर ट्रेनों का विस्तार किया है।

रेल्वे, होळी सण आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सोलापूर विभागातून धावणाऱ्या विशेष गाड्यांची सेवा सुरू ठेवणार आहे.
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी होळी उत्सव आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सोलापूर विभागातून धावणाऱ्या विशेष गाड्यांची सेवा रेल्वे सुरू ठेवणार आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
साप्ताहिक विशेष गाड्यांचा विस्तार
- ट्रेन क्रमांक ०१४३५ सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष २४.०२.२०२६ पर्यंत दर मंगळवारी धावणार होती. ती आता १४.०७.२०२६ पर्यंत धावणार आहे.
- ट्रेन क्रमांक ०१४३६ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-सोलापूर साप्ताहिक विशेष २५.०२.२०२६ पर्यंत दर बुधवारी धावणार होती. ती आता १५.०७.२०२६ पर्यंत धावणार आहे.
- ट्रेन क्रमांक ०१४७७ सोलापूर-अनकापल्ले साप्ताहिक विशेष गाडी २७.०२.२०२६ पर्यंत धावणार होती. ती आता दर शुक्रवारी १०.०७.२०२६ पर्यंत धावणार आहे.
- ट्रेन क्रमांक ०१४७८ अनकापल्ले-सोलापूर साप्ताहिक विशेष गाडी २७.०२.२०२६ पर्यंत धावणार होती. ती आता दर शनिवारी ११.०७.२०२६ पर्यंत धावणार आहे.
दैनिक विशेष गाड्यांची माहिती
२८.०२.२०२६ पर्यंत दररोज धावण्यासाठी अधिसूचित केलेल्या खालील दैनिक गाड्या १५.०७.२०२६ पर्यंत सुरू ठेवण्यात आल्या आहेत:
- ट्रेन क्रमांक ०१४६१/०१४६२ सोलापूर-दौंड अनारक्षित दैनिक विशेष
- ट्रेन क्रमांक ०१४६५/०१४६६ सोलापूर-कलबुरगि अनारक्षित दैनिक विशेष
- ट्रेन क्रमांक ०१४८७/०१४८८ हडपसर-हरंगुळ अनारक्षित दैनिक विशेष
"वरील गाड्यांच्या वेळा, रचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही."
आरक्षण आणि बुकिंग तपशील
विशेष शुल्कावर विशेष गाड्यांच्या सततच्या फेऱ्यांसाठी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर आरक्षण उपलब्ध असेल.
अनारक्षित डब्यांसाठी बुकिंग स्थानकांवर बुकिंग काउंटर आणि रेलवन अॅपद्वारे देखील करता येते. प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकिटांसह प्रवास करण्याची विनंती करण्यात येत आहे. या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा RailOne अॅप किंवा NTES अॅप डाउनलोड करा.
दिनांक: १२ फेब्रुवारी २०२६
जनसंपर्क क्रमांक SUR/२०२६/०२/०४
हे प्रसिद्धी पत्रक मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या जनसंपर्क विभागाने जारी केली आहे.

Pratahkal Bureau
प्रातःकाल ब्यूरो, प्रातःकाल न्यूज़ की वह समर्पित संपादकीय टीम है, जो सटीक, सामयिक और निष्पक्ष समाचार पहुँचाने के लिए प्रतिबद्ध है। हमारा ब्यूरो राजनीति, समाज, अर्थव्यवस्था और राष्ट्रीय मामलों में सत्यापित रिपोर्टिंग, गहन विश्लेषण और जिम्मेदार पत्रकारिता पर अपना ध्यान केंद्रित करता है।
