मध्य रेलवे ने ट्रेन संख्या 22629/22630 में अप्रैल 2026 से कोचों की संख्या 16 से बढ़ाकर 22 करने का निर्णय लिया है।

रेल्वे प्रशासन ट्रेन क्रमांक 22629/22630 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुनेलवेली – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसमध्ये कायमस्वरूपी ६ अतिरिक्त डबे जोडणार आहे. यामध्ये १ वातानुकुलीत द्वितीय, ४ वातानुकुलीत तृतीय आणि १ शयनयान डब्याचा समावेश आहे.


ट्रेन क्रमांक 22629/22630: डब्यांची जुनी आणि सुधारित संरचना

या गाडीच्या डब्यांच्या रचनेत करण्यात आलेला बदल खालीलप्रमाणे आहे:

  • जुनी संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, २ वातानुकुलीत तृतीय, १ वातानुकुलीत तृतीय इकॉनॉमी, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय, १ द्वितीय आसनव्यवस्था सह सामान व गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार – एकूण १६ एलएचबी डबे.
  • सुधारित संरचना: २ वातानुकुलीत द्वितीय, ६ वातानुकुलीत तृतीय, १ वातानुकुलीत तृतीय इकॉनॉमी, ७ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसनव्यवस्था सह सामान व गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार – एकूण २२ एलएचबी डबे.

अंमलबजावणीची तारीख

प्रवाशांच्या सुविधेसाठी ही सुधारित सेवा खालील तारखांपासून सुरू होईल:

  • ट्रेन क्रमांक 22629 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुनेलवेली एक्सप्रेस दि. १६.०४.२०२६ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुधारित संरचनेसह धावेल.
  • ट्रेन क्रमांक 22630 तिरुनेलवेली – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दि. १५.०४.२०२६ पासून तिरुनेलवेली येथून सुधारित संरचनेसह धावेल.

प्रवाशांसाठी सूचना

"प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी. या गाड्यांच्या सविस्तर वेळापत्रक व थांब्यांच्या माहितीसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा."

दिनांक: १४ फेब्रुवारी, २०२६ प्र. प. क्रमांक: २०२६/०१/२० सदर प्रसिद्धीपत्रक मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथील जनसंपर्क विभागामार्फत जारी करण्यात आले आहे.

Pratahkal Bureau

Pratahkal Bureau

प्रातःकाल ब्यूरो, प्रातःकाल न्यूज़ की वह समर्पित संपादकीय टीम है, जो सटीक, सामयिक और निष्पक्ष समाचार पहुँचाने के लिए प्रतिबद्ध है। हमारा ब्यूरो राजनीति, समाज, अर्थव्यवस्था और राष्ट्रीय मामलों में सत्यापित रिपोर्टिंग, गहन विश्लेषण और जिम्मेदार पत्रकारिता पर अपना ध्यान केंद्रित करता है।

Next Story