महापालिका आयुक्त अभिनव गोयल के निर्देश पर ४/जे प्रभाग की सहायक आयुक्त सविता हिले ने बकाया संपत्ति कर वसूली के लिए अस्पताल पर जप्ती की कार्रवाई की।

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण येथील माहिती व जनसंपर्क विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्त विशेष क्र. २८०, दिनांक २६/०२/२०२६ नुसार, महापालिकेच्या ४/जे प्रभागात थकबाकीदारांविरोधात धडक कारवाई करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या प्रभागात कर वसुलीची मोहिम अधिकाधीक तीव्र करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मुरबाड रोड कल्याण (प.) येथील एका रुग्णालयावर ही कारवाई करण्यात आली.

थकबाकीपोटी रुग्णालयाच्या प्रशासकीय कक्षावर जप्तीची कारवाई

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, काल कल्याण (प.) मुरबाड रोड येथील ४/जे प्रभागातील भारत एम सूचक संचलित ए ॲण्ड जी हॉस्पिटल (मिळकत क्र. B02012338601) वर ही कारवाई पार पडली. सदर रुग्णालयाकडे रक्कम रुपये ७५,४७,०२५/- एवढी मोठी थकबाकी शिल्लक होती. या ७५,४७,०२५/- रुपयांच्या थकबाकीपोटी ए ॲण्ड जी हॉस्पिटलची ॲडमीन रुम सिल करण्याची धडक कारवाई महापालिकेच्या ४/जे प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सविता हिले व त्यांच्या पथकाने केली.

कर चुकवेगिरी करणाऱ्यांना महापालिकेचा इशारा आणि आवाहन

महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, जे नागरिक किंवा संस्था कर भरण्यास टाळाटाळ करत आहेत त्यांच्यावर कठोर पावले उचलली जातील. "कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर या पुढेही अशी कारवाई केली जाईल, तरी महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपला कराचा भरणा विहित मुदतीत करावा असे आवाहन महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागामार्फत करण्यात येत आहे." असे अधिकृत पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Pratahkal Bureau

Pratahkal Bureau

प्रातःकाल ब्यूरो, प्रातःकाल न्यूज़ की वह समर्पित संपादकीय टीम है, जो सटीक, सामयिक और निष्पक्ष समाचार पहुँचाने के लिए प्रतिबद्ध है। हमारा ब्यूरो राजनीति, समाज, अर्थव्यवस्था और राष्ट्रीय मामलों में सत्यापित रिपोर्टिंग, गहन विश्लेषण और जिम्मेदार पत्रकारिता पर अपना ध्यान केंद्रित करता है।

Next Story