सर्फिंगचे अनेक फायदेही आहेत. शारीरिक तंदुरुस्ती वाढवण्यासाठी हा एक उत्कृष्ट व्यायाम प्रकार आहे. स्नायू, हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. नैसर्गिक वातावरणामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. भारतासारख्या लांब समुद्रकिनारा लाभलेल्या आपल्या देशात, आता गोव्यापासून महाराष्ट्रातील (तारकर्ली) आणि कर्नाटकातील किनाऱ्यांपर्यंत सर्फिंगची आवड वाढत आहे. तरुण पिढी या खेळाकडे मोठ्या उत्साहाने वळत आहे.


विनश्री राणे.


डोळ्यासमोर अथांग निळे पाणी... समोरून येणाऱ्या मोठाल्या लाटेचा आवाज... आणि पायाखालील ती छोटीशी फळी (बोर्ड). एका क्षणात आपण त्या वेगवान गोष्टीवर म्हणजेच समुद्राच्या लाटेवर, स्वार झालेलो असतो. याच क्षणाला सर्फिंग म्हणतात! हा क्षण जगण्यासाठी, हजारो मैल प्रवास करून, लाखो लोक समुद्राच्या दिशेने धावतात.

अनेक चित्रपटांमध्ये आपण पाहिलेल्या ह्या खेळाचा जन्म झाला हवाई बेटांवर... खरंतर तिथल्या लोकांसाठी हा खेळ नव्हताच कधी! त्यांच्यासाठी तो श्रद्धेचा, संस्कृतीचा भाग होता. समुद्राला देव मानणाऱ्या त्या लोकांसाठी सर्फिंग म्हणजे देवाच्या जवळ जाण्याचा, त्याच्याशी संवाद साधण्याचा एक मार्ग म्हणून नेहमी पहिले .



२०व्या शतकात हा खेळ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि नंतर जगभर पोहोचला. आज सर्फिंगला ऑलिम्पिक स्पोर्ट म्हणूनही मान्यता मिळाली आहे. हा खेळ खेळणाऱ्याला सर्फर असे म्हंटले जाते. सर्फर सर्फबोर्ड उभा राहून, योग्य लाटेची निवड करतो आणि संपूर्ण शारीरिक संतुलन आणि कौशल्याच्या जोरावर लाटेच्या टोकावर तरंगत राहतो. सर्फिंगसाठी लागणारे प्राथमिक साहित्य अगदी साधे आहे: एक सर्फबोर्ड आणि पायाला बांधण्यासाठी 'लेश' (Leash), परंतु या साध्या साहित्यापलीकडे, सर्फरला लागतात ते म्हणजे अदम्य साहस, लाटांचे अचूक ज्ञान आणि कमालीची शारीरिक क्षमता.

समुद्राच्या खाऱ्या पाण्यातील तो क्षणिक प्रवास, आयुष्यातील तणाव विसरायला लावतो आणि एक प्रकारची शांती देतो. सोबतच आपल्याला हे शिकवून जातो की आयुष्यातल्या मोठ्या लाटांवर आपलं नियंत्रण नसतं पण आपण प्रयत्न केला तर त्यावर स्वार होत त्याची मज्जा नक्कीच घेऊ शकतो.



सर्फिंगचे अनेक फायदेही आहेत. शारीरिक तंदुरुस्ती वाढवण्यासाठी हा एक उत्कृष्ट व्यायाम प्रकार आहे. स्नायू, हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. नैसर्गिक वातावरणामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. भारतासारख्या लांब समुद्रकिनारा लाभलेल्या आपल्या देशात, आता गोव्यापासून महाराष्ट्रातील (तारकर्ली) आणि कर्नाटकातील किनाऱ्यांपर्यंत सर्फिंगची आवड वाढत आहे. तरुण पिढी या खेळाकडे मोठ्या उत्साहाने वळत आहे.

सर्फिंग म्हणजे काय हे तर जाणून घेतलं आता सर्फिंग करताना काय काळजी घेतली पाहिजे हे पण जाणून घेऊया. सर्फिंग रोमांचक जरी असलं तरी सुरक्षितता ही नेहमीच प्रथमअसली पाहिजे . चला जाणून घेऊया सुरक्षितता कशी पाळायची .




  • एकटं सर्फिंग कधीच करू नका.
  • प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच करा.
  • हवामान, पाण्याचा प्रवाह, दिशा तपासा.
  • नवशिक्यांनी सौम्य लाटांपासून सुरुवात करावी.

तर मित्रांनो, पुढच्या वेळी समुद्रकिनारी गेलात आणि लाटांनी पायाला स्पर्श केला, तर केवळ त्यांचं सौंदर्य पाहू नका तर त्यांच्यावर स्वार होऊन त्यांच्यासोबत प्रवास करा. काय माहीत कदाचित तिथेच तुम्हाला तुमचं पुढचं अ‍ॅडव्हेंचर सापडेल.

Updated On 29 Oct 2025 4:19 PM IST
Ashiti Joil

Ashiti Joil

यह प्रातःकाल में कंटेंट रायटर अँड एडिटर के पद पर कार्यरत हैं। यह गए 3 सालों से पत्रकारिता और डिजिटल मीडिया में सक्रिय हैं। इन्होंने लोकसत्ता, टाईम महाराष्ट्र, PR और हैट मीडिया में सोशल मीडिया कंटेंट रायटर के तौर पर काम किया है। इन्होंने मराठी साहित्य में मास्टर डिग्री पूर्ण कि है और अभी ये यूनिवर्सिटी के गरवारे इंस्टीट्यूड में PGDMM (Marthi Journalism) कर रही है। यह अब राजकरण, बिजनेस , टेक्नोलॉजी , मनोरंजन और क्रीड़ा इनके समाचार बनती हैं।

Next Story