- विनश्री राणे

- विनश्री राणे



वाळवंट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते अथांग पसरलेले वाळूचे डोंगर, पांढऱ्याशुभ्र वस्त्रांतील ‘हब्बीबी’ म्हणणारे शेख आणि रखरखीत, उजाड माळरान. एकेकाळी जिथे जीवसृष्टीही तग धरू शकत नाही असं मानलं जायचं, त्याच वाळवंटात आज नंदनवन फुललं आहे. 'प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे' या उक्तीप्रमाणे, या वाळवंटातही साहसाचं सोनं गवसलं आणि त्यातूनच जन्म झाला ड्यून बॅशिंगचा!




ड्यून बॅशिंग म्हणजे काय ?


ड्यून बॅशिंग म्हणजे वाळवंटातील एक अविस्मरणीय सफर, पण ही काही साधीसुधी सफर नाही. ही आहे 4x4 ड्राइव्ह गाडीच्या इंजिनच्या जोरदार आवाजासह, खिडक्यांवर आदळणाऱ्या वाळूसोबत आणि वाळवंटातील वाऱ्याशी स्पर्धा करणारी एक थरारक राइड! पूर्वी केवळ पर्याय नसल्यामुळे वाळवंटातून वाहने चालवली जात होती. पण त्याच प्रवासादरम्यान अनेकांना वाळूच्या उंच डोंगरांवरून वेगाने गाडी चालवताना एक वेगळीच मजा आणि थरार अनुभवता येतो हे लक्षात आलं.





या अनुभवाची प्रसिद्धी 'ड्यून बॅशिंग' किंवा 'ड्यून सफारी' म्हणून जगभर पसरली. दुबईतील ड्यून सफारी तर जगभरात खूप प्रसिद्ध आहे. जगभरातील पर्यटक हा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी खास दुबईला भेट देतात. वाळूच्या टेकड्यांवरून हवेत उडणारी आणि मग अचानकच खाली घसरणारी ती गाडी, आतमध्ये हिंदकळणारे पर्यटक, खिडकीवर आदळणारी सोनेरी वाळू आणि दूर कुठेतरी विस्तीर्ण वाळवंटात मावळणारा सूर्य... हा नजारा कायम डोळ्यात आणि मनात साठवून ठेवावा असाच असतो. यासाठी फक्त दुबईलाच जायला हवं असं नाही बरं का! आपल्या भारतातल्या थर वाळवंटातही आता आपल्याला ड्यून बॅशिंगचा अनुभव घेता येतो. साधारण 20 ते 30 मिनिटांची ही सफारी असते. काही ठिकाणी यासोबतच उंटाची (कॅमल) सवारी करण्याची संधीही मिळते.





ड्यून बॅशिंग करताना काय काळजी घ्यावी ?


  • सीटबेल्ट घट्ट बांधणे आवश्यक आहे; किंबहुना, तिथे तो बांधणे बंधनकारकच असते.
  • हृदयरोग किंवा मणक्याचे आजार असणाऱ्यांनी हा थरारक अनुभव टाळलेलाच बरा.
  • चला तर मग, वाळवंटातील हा सुंदर आणि थरारक अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा!



Updated On 10 Sept 2025 6:31 PM IST
Ashiti Joil

Ashiti Joil

यह प्रातःकाल में कंटेंट रायटर अँड एडिटर के पद पर कार्यरत हैं। यह गए 3 सालों से पत्रकारिता और डिजिटल मीडिया में सक्रिय हैं। इन्होंने लोकसत्ता, टाईम महाराष्ट्र, PR और हैट मीडिया में सोशल मीडिया कंटेंट रायटर के तौर पर काम किया है। इन्होंने मराठी साहित्य में मास्टर डिग्री पूर्ण कि है और अभी ये यूनिवर्सिटी के गरवारे इंस्टीट्यूड में PGDMM (Marthi Journalism) कर रही है। यह अब राजकरण, बिजनेस , टेक्नोलॉजी , मनोरंजन और क्रीड़ा इनके समाचार बनती हैं।

Next Story